Diva Dumping Ground : दिव्यातील डपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटला, डंपिंग ग्राऊंडसाठी दुसरी जागा ठरली

ठाण्याजवळील दिवावासियांसाठी खूशखबर आहे. दिव्यातील डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न कायमस्वरुपी सुटलाय. कचऱ्याची विल्हेवाट लावण्य़ासाठी भंडार्लीतील जागा ठाणे महापालिकेने भाडेतत्वावर घेतली आहे. या जागेवर लवकरच घनकचरा विघटन प्रकल्प सुरु होणार आहे. जागा हस्तांतरण करारनाम्यावर आज महापौर नरेश म्हस्के यांनी स्वाक्षरीही केली. त्यामुळं आता दिवावासियांची डंपिंगच्या त्रासातून मुक्तता होणार आहे. ठाणे शहरातील बहुतांश कचरा हा दिवा येथील डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येत होता. त्यामुळं कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करत होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola