Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांच्याकडून धारावीमध्ये कलाकारांना रेशन किटचे वाटप
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज धारावीमध्ये कलाकारांना रेशन किटचे वाटप केले. धारावीमध्ये आज दिव्याज फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी मुंबईच्या विविध भागातून लोक कलावंत आणि बॅक स्टेज कलाकार उपस्थित झाले होते. त्यांना अमृता फडणवीस यांच्या हस्ते रेशनिंग किट वाटप करण्यात आले. यावेळी कलाकारांनी त्यांच्या व्यथा देखील मांडल्या. या वेळी कलाकारांना अश्रू ही अनावरण झाले होते. यावेळी अमृता फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर प्रसार माध्यमांशी चर्चा केली.