Vidhan Sabha : राज्यातील साखर कारखान्यांच्या विक्रीतील गैरव्यवहाराचा मुद्द्यावरुन विधानसभेत चर्चा
Vidhan Sabha : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीतील गैरव्यवहाराचा मुद्दा आज विधानसभेत चर्चेला आला. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरलं. अण्णा हजारे यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. सरकार त्याची चौकशी करणार का असा सवाल फडणवीस यांनी केला. तर अजित पवारांनी याबाबतचे आरोप फेटाळून लावले.