Nawab Malik replies Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे...

Nawab Malik : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे अंडरवर्ल्डसोबत कनेकशन होते. याचा खुलासा उद्या सकाळी मी करणार असल्याचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की दिवाळीनंतर फटाके फोडू, पण मला वाटतं फटाके भिजले आणि वाया गेले. नवाब मलिकांनी बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. मात्र देवेंद्रजी १९९९ ला तुम्ही या शहरात पहिल्यांदा आमदार म्हणून आलात. यापूर्वी मुंडे साहेबांनी अनेकांचे तार दाऊदशी जोडले. मात्र ६२ वर्षांच्या कार्यकाळात किंवा २६ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत असे आरोप कोणी सिद्ध करु शकले नाहीत. मी कवडीमोल दराने जमीन माफियाकडून घेतल्याचा आरोप फडणवीसांनी केला. मात्र फडणवीसांना चुकीची माहिती कोणीतरी देतोय.. तुम्ही सांगितलं असतं तर मीच तुम्हाला कागदपत्र दिले असते. अंडरवर्ल्डचा खेळ जो सुरु केला आहे, आज मी बोलणार नाही, मात्र उद्या सकाळी १० वाजता देवेंद्र फडणवीसांचा अंडरवर्ल्डशी काय संबंध आणि मुख्यमंत्री असताना सर्व शहराला ओलीस ठेवलं होतं त्याचाा पर्दाफाश करणार, असं मलिक म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola