Devendra Fandavis : देवेंद्र फडणवीसांनी बोलावली भाजप नगरसेवकांची बैठक, मराठी नगरसेवक नाराज ?
Continues below advertisement
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुंबईतल्या भाजप नगरसेवकांची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी 7 वाजता फडणवीसांच्या सागर या बंगल्यावर ही बैठक होणार आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. निवडणूक झाल्यास दगाफटका होऊ नये म्हणून भाजपकडून आत्तापासूनच काळजी घेतली जात आहे. विधानपरिषदेसाठी काँग्रेसच्या सुरेश कोपरकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे तर भाजपनं राजहंस सिंह हा उत्तर भारतीय चेहरा मेैदानात उतरवला आहे आणि त्यामुळं मराठी नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आहे.
Continues below advertisement