Mumbai Mayor | मुंबई महापौर पदासाठी भाजप उमेदवार देणार नाही : मनोज कोटक | ABP Majha

Continues below advertisement
मुंबई महापौरपद निवडणुकीत भाजप उमेदवार देणार नाही अशी माहिती भाजप खासदार आणि पालिकेतील भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी दिलीय. नगरसेवकांचं आवश्यक संख्याबळ नसल्याने भाजप मुंबई महापौरपदाची निवडणूक लढणार नाही असं कोटक यांनी म्हटलंय. तसंच 2022 ला मुंबईत भाजपचाच महापौर असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. महापौरपदासाठी निवडणूक अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत आहे. मात्र मुंबई पालिकेत भाजप पहारेकऱ्याच्या भूमिकेत कायम राहणार आहे. राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या संघर्षाचे पडसाद तूर्तास तरी मुंबई महापालिकेत उमटणार नाहीत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram