Adopt A Breathe :आदिवासी चित्रशैलीतून वारली पेटिंगचा देखावा, प्रत्येकाला प्रसाद म्हणून झाडाचं रोपटं!
अभिषेक मुठाळ
Updated at:
11 Sep 2021 11:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक गणेश मंडळांकडून सामाजिक भान आणि पर्यावरणपूरक असे संदेश दिले जात असतात. अशातच विद्यार्थ्यांचा राजा अशी ओळख असलेल्या रुईया नाका मंडळाकडून यावर्षी पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला आहे. ‘Adopt a breathe’ या संकल्पनेवर आधारित आदिवासींच्या चित्रशैलीतून वारली पेटिंगचा देखावा उभारण्यात आला आहे. त्याचसोबत येणाऱ्या प्रत्येकाला प्रसाद म्हणून झाडाचे रोपटे देण्यात येणार आहे. कोरोना काळात आॅक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्याच पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक असा संदेश ह्या विद्यार्थ्यांच्या मार्फत देण्यात आला आहे.