OBC Reservation : OBC आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देता येणार नाही' : Supreme Court
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात दिली आहे. हे आरक्षण कुठल्याही स्थितीत टिकविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. फेब्रुवारी-मार्च 2022 पर्यंत होणाऱ्या निवडणुकांसाठी एम्पिरिकल डेटा गोळा करून आरक्षण टिकवणार असल्याचा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. या निवडणुका चार महिने पुढे ढकलण्यात याव्यात अशी सर्वपक्षीय भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे कायदाच असल्याने तो देशाला लागू झाल्याने देशातील ओबीसी आरक्षण धोक्यात असल्याचे मत त्यांनी मांडले. केंद्र सरकारने केलेली जनगणना व त्याची आकडेवारी-डेटा तातडीने राज्याला द्यावा अशी मागणी त्यांनी केली. पुढील अल्पकालावधीत राज्य मागासवर्ग आयोग एम्पिरिकल डेटा गोळा करून हे आरक्षण टिकविण्यासाठी बाबत ठोस कृती करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.