Devendra Fadnavis यांनी सुत्रं हलवल्याने कुवेतमध्ये अडकलेल्या युवकाची सुटका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार उमा खापरे यांच्यामुळे कुवेतमध्ये अडकलेल्या एका युवकाची सुटका झालीये.. सागर संकपा असं या युवकाचं नाव आहे. कुवेतमध्ये जास्त पगार मिळण्याच्या अमिषाने तो कामासाठी गेला होता. पण त्याची फसवणूक झाल्याचं त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने मायदेशी परत येण्याचं ठरवलं. मात्र, संबधीत कंपनीने त्याचा मोबाईल आणि पासपोर्ट जप्त केल्यामुळे त्याला मायदेशी येणं शक्य नव्हतं.. अखेर हतबल झालेल्या सागरने त्यांचा भाऊ रोहितला फोन केला. त्यांनी ही बाब आमदार उमा खापरे यांच्या कानावर घातली. त्यानंतर खापरे यांनी फडणवीस यांच्याशी संपर्क साधून विदेश मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला.. अखेर  केंद्रीय विदेश मंत्रालयाने खापरे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत सागरला मायदेशी परत आणण्याची व्यवस्था केली. सुखरुप मायदेशी परतलेल्या सागरने संकपा आणि त्याच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उमा खापरेंचे आभार मानलेत.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola