Dasara Melava Controversy : राज ठाकरे एकनाथ शिंदे एकत्र दसरा मेळावा घेणार?
जस जशी दसरा मेळाव्याची तारीख समोर येत आहे. तस तशी शिवसेनेमध्ये चलबिचल वाढली आहे. कारण दसरा मेळाव्याला केवळ एक महिना बाकी असतानाही शिवसेनेला अजूनही परवानगी मिळालेली नाही आणि दुसरीकडे शिंदे गटानेही दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केल्यानं आता महापालिकेसमोर प्रश्न पडला आहे. आता कोणत्या शिवसेनेला दसरा मेळाव्याची परवानगी द्यायची?