Mumbai Dam : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठ्यात वाढ : ABP Majha
मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये रोज मोठ्या प्रमाणात जलसाठ्यात वाढ होतेय. २७ जून रोजी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये ६.४९ टक्के पाणी साठी होता. मात्र, आठवडाभराच्या पावसामुळे हा पाणीसाठा आता १२.८५ टक्क्यांवर पोहोचलाय. सध्या धरणक्षेत्रात संततधार सुरू असून तेथे दररोज १०० ते १५० मिमी पावसाची नोंद होत आहे.