Dahihandi 2023 : आयोजकांनी सेलिब्रिटीपेक्षा बाळ गोपाळंना महत्त्व द्या, दहीहंडी पथकांची मागणी
दहीहंडी उत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपलाय. यासाठी आता गोविंदा पथकांचा सराव जोरदार सुरु झालाय. घाटकोपरचं क्रांती गोविंदा पथक हे आठ आणि नऊ थर लावण्यासाठी आणि अनोख्या संकल्पना करण्यास प्रसिद्ध आहे.फिरते थर, डोळे बंद करून थर लावणे, शिवाजी महाराज यांचे पराक्रम सांगणारे थर, देशभक्तीपर थर , वारकरी संप्रदाय दाखवणारे थर अशा अनेक हटके संकल्पना या पथकाने आत्तापर्यंत केल्या आहेत. यंदा देखील हे पथक आठ थरांची तयारी करीत आहे.दहीहंडी ची वेळ रात्री बारा वाजेपर्यंत करावी आणि जास्तीत जास्त आयोजकांनी यंदा दहीहंडी उत्सव ठेवावा अशी मागणी या गोविंदा पथकाने केली आहे.