Dahanu Palghar : API सुहास खरमाटे पोलिसांच्या ताब्यात, भरधाव गाडी चालवून दोघांना उडवलं
पालघर : पालघर जिल्ह्यात डहाणूमध्ये भरधाव गाडीनं पादचाऱ्यांना उडवल्याची (Hit and Run case in Palghar) दुर्घटना घडली आहे. गाडी चालवणारा पोलीस अधिकारी असल्याचं सांगण्यात येतंय. चिंचणी ते डहाणू प्रवास करताना चालकानं बाजूनं चालत असलेल्या पती-पत्नीला धडक दिली. अपघातानंतर चालक फरार झाला अशी माहिती पोलीस उपअधीक्षकांनी दिली. ही गाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खारमाटे यांच्या नावावर आहे.