Dadar Valet Parking:दादर मार्केटमध्ये पार्किंगचं टेन्शन मिटलं;गाडी पार्किंगला द्या,मनसोक्त खरेदी करा
सणासुदीला निर्माण होणाऱ्या दादर मार्केटमधील पार्किंगच्या समस्येवर व्हॅलेट पार्किंगचा पर्याय, *मुंबईत पहिल्यांदा दिवाळी दसऱ्याला होणारी पार्किंगची समस्येवर उपाय म्हणून सणासुदीच्या काळात दादर मार्केटमध्ये व्हॅलेट पार्किंगची सुविधा आजपासून सुरु होते आहे, अनलॉक नंतर पुन्हा एकदा मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी वाढत आहे आणि त्यात दसरा दिवाळी सारखे सण तोंडावर आहेत . यामध्ये मार्केटमध्ये आलेल्या ग्राहकांनी आपल्या गाड्या नेमका ठेवायचा कुठे ? पार्क कुठे करायचा ? असा प्रश्न पडतो आणि त्यालाच पर्याय म्हणून अगदी मॉल प्रमाणे व्हॅलेट पार्किंगची मोफत सुविधा दादर मुंबई महापालिका आणि व्यापारी संघाकडून उद्यापासून सुरू करण्यात येतीये. तुम्ही एकदा मार्केट मध्ये आले की वेगवेगळ्या ठिकाणी असलेले व्हॅलें पार्किंगचे कर्मचारी तुमची गाडी पार्क करायला घेऊन जाणार आणि पुन्हा आणून देणार... काय आहे ही बॅलेट पार्किंगची सुविधा आणि दादर मार्केट मध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला कशा प्रकारे त्याचा लाभ घेता येणार पाहूया