Dadar| दिवाळीनंतर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊनही दादर मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी
महाराष्ट्राची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेनं चालू आहे का असा प्रश्न आता पडू लागलाय. कारण दिवाळीनंतर महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढू लागलीय. प्रमुख शहरातल्या आकड्यांवरुन ही गोष्ट समोर आलीय. दिवाळीच्या दिवसात खरेदीसाठी बाहेर पडू नका. गर्दी करु नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेला वारंवार केलं होतं. मात्र मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबादमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली आणि याचाच फटका आता बसण्याची चिन्हं आहेत.