Barge P-305 दुर्घटनेप्रकरणी कॅप्टन राकेश बल्लवसह इतरांवर गुन्हा दाखल
बार्ज P-305 दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्ज इंजीनिअर मुस्तफिजूर रहमान यांच्या तक्रारीवर कॅप्टन राकेश बल्लाव आणि इतरांवर कलम 304(2),338 अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतरही राकेश बल्लव यांनी बार्जवरील कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घातला, असा आरोप रहमान यांनी केला आहे. दरम्यान पोलीस राकेश बल्लाव यांचा शोध घेत आहेत.