Cruise Party : नवाब मलिकांचा मोठा आरोप, पार्टीचा आयोजक वानखेडेंचा मित्र! त्याला अटक का केली नाही?

Continues below advertisement

Cruise Drugs Case : कॉर्डिलिया ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये नवाब मलिक यांनी आज एबीपी माझाशी बोलताना एक मोठा आरोप केला आहे. कॉर्डिलियावरची पार्टी जर एफ टीव्हीचे इंडिया हेड काशिफ खान यांनी आयोजित केली होती. तर त्यांना अटक का झाली नाही, असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे. नवाब मलिक यांनी जारी केलेल्या कॉर्डिलियावरच्या पार्टीतल्या व्हीडिओमध्ये काशिफ खान आपल्या गर्लफ्रेन्डसोबत दिसत आहेत आणि असं असतानाही, पार्टीच्या आयोजकाला का अटक केली नाही, असा सवाल मलिक यांनी विचारला आहे. काशिफ खान आणि समीर वानखेडे हे घनिष्ठ मित्र असल्यानेच त्यांच्यावर कारवाई केली नाही, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram