
Aryan Khan: आर्यन खानला जामीन मिळावा, Ram Kadam यांची प्रार्थना; ट्वीट करत सरकारवर निशाणा
Continues below advertisement
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टात आज सुनावणी होणार आहे. याबाबत नुकतच भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये राम कदम यांनी आर्यनला जामीन मिळण्यासाठी प्रार्थना केली आहे. राम कदम यांनी ट्विटमध्ये लिहीले, 'प्रार्थना आहे की आज आर्यन खानल जामीन मिळावा. संविधान आणि कायद्याप्रमाणे जामीन मिळणं हा एक मुलभूत अधिकार आहे. ही लढाई कोणा एका व्यक्ती विशेषच्या विरोधतील नाही. अखंड मानव जातीची ड्रग्सविरोधी लढाई आहे. अपेक्षा होती महाराष्ट्र सरकार निदान या ड्रग्स प्रकरणात , ड्रग्स माफियाविरोधात उभे राहतील. मात्र वसुलीचा प्रभाव स्पष्ट दिसला. '
Continues below advertisement