Mumbai MonoRail चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर Dr. DLN Murthy यांच्याविरोधात गन्हा
मुंबई मोनोरेलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. डी. एन. एल. मूर्ती यांच्यावर एसीबीकडून गुन्हा नोंदवण्यात आलाय. थकीत बिल मंजूर करण्यासाठी २० लाखांची लाच मागितल्याचा आरोप मूर्ती यांच्यावर लावण्यात आलाय. जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०२० या काळासाठी फॅसिलीटी मॅनेजमेंट कंपनीकडे मोनोरेल प्रकल्पांतर्गत साफसफाई, हाऊसकीपिंग, मेन्टेनन्स, कस्टमर केअर संबंधित कामाचं कंत्राट होतं. वरील कामं पूर्ण केल्याच्या अनुषंगानं संबंधित कंपनीला अडीच कोटींचं बिल आणि ३२ लाख रुपये बँक गॅरंटी रक्कम मिळणं अपेक्षित होती. पण, वारंवार प्रयत्न केल्यानंतर फेब्रुवारी ते मार्च २०२१ पर्यंत त्या कंपनीला