coronavirus | कोरोनाचा गैरसमज दूर करण्यासाठी क्रिकेटचे आयोजन, विजेत्या संघाला कोंबड्यांचं बक्षीस
चिकन खाल्ल्यानं कोरोना होतो या अफवेमुळे पोल्ट्री व्यावसायिकांचं प्रचंड नुकसान होतोय. नागरिकांमध्ये हा गैरसमज दूर करण्यासाठी विरारमध्ये चक्क क्रिकेट सामने भरवण्यात आले. यावेळी विजेत्या संघाना कोंबड्या आणि कोंबडे बक्षीस देण्यात आले. विजयी संघाला चक्क ११ कोंबडे तर उपविजेत्यांना ११ कोंबड्या बक्षीस देण्यात आले. आगरी समाजाच्यावतीनं गावकप नावाने क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आली होती.