Cricket match of Women's | महिला पोलिस Vs नऊवारीतील महिलांचा क्रिकेट सामना | ABP Majha
ठाण्यातील येऊर परिसरात पोलीस दलातील महिला विरूद्ध नऊवारीतील महिला असा क्रिकेट सामना रंगला. ठाण्यातील वर्तक नगर मधील पोलीस ठाण्यातील महिला पोलीसांच्या ड्रेस कोडमध्ये तर मातृसेवा फाउंडेशनच्या महिला नथ घालून पारंपरिक पद्धतीने नऊवारी साडी नेसल्या होत्या. अतिशय रोमांचकारी झालेल्या या सामन्यात नऊवारी नेसलेल्या प्रतिस्पर्धी महिलांचा पोलीस दलातील महिलांनी पराभव केला. पोलिसांच्या टीमने तीन षटकांत 91 धावा घेतल्या तर मातृसेवा फाउंडेशनच्या महिलांनी 78 धावा काढल्या.