धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात पत्नी-पत्नी रेल्वेखाली घसरले, तीन डबे गेल्यानंतरही दोघेही सुखरुप

Continues below advertisement

चालत्या एक्स्प्रेस मध्ये चढण्याच्या प्रयत्नात हात सुटल्याने पती-पत्नी चालत्या गाडी खाली गेल्याची घटना काल  सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कल्याण स्थानकात घडली. प्रवाशांनी सतर्कता दाखवत तत्काळ चैन  खेचण्यासाठी आरडाओरड केली. एक्सप्रेस मधील प्रवाशांनी चैन खेचली, गाडी स्लो असल्याने लगेच गाडी देखील थांबली. प्रवासी आणि टीसीच्या मदतीने एक्स्प्रेस खाली गेलेल्या  दोघा पती पत्नीला सुखरूप बाहेर काढण्यात आलं .काही वेळाने दोघांना पुन्हा त्याच गाडीत बसवून पुढील प्रवासाला रवाना करण्यात आले. दरम्यान दोघे पती पत्नी  फलाटाच्या भिंतीचा आसरा घेऊन होते. अंगावरून एक्स्प्रेसचे तीन डबे गेल्यानंतरही दोघेही सुखरूप असल्याने देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram