Mumbai Corona : मुंबईकरांनो काळजी घ्या! उच्चभ्रू वस्त्यांमधल्या वाढत्या रुग्णसंख्येनं चिंतेत भर
Continues below advertisement
मुंबईत कोरोनाचं संकट पुन्हा एकदा वाढताना दिसतंय. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा वाढता प्रभावही या सगळ्याला कारणीभूत ठरतोय. त्यात मुंबईच्या उच्चभ्रू वस्त्यांमध्ये वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंतेची बाब ठरतेय. मुंबई महापालिकेनं खबरदारीचा उपाय म्हणून अशा सोसायट्यांसाठी नियमावली जाहीर केलीय.
Continues below advertisement