Mumbai Corona Rise : मुंबईत पुन्हा कोरोनाची डोकेदुखी, मुंबई महापालिकेची सतर्कता

Continues below advertisement

मुंबईत कोरोनानंही पुन्हा डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे. मुंबईत आज ३६ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. या ३६ रुग्णांपैकी ३४ रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. दरम्यान, मुंबईतल्या सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा १४४ झाला आहे. त्यामुळं आधीच H3N2 इन्फ्लुएंझा विषाणूची भीती निर्माण झालेली असताना मुंबईत कोरोनाचाही प्रादुर्भाव वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं या परिस्थितीत नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. देशात नव्या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबई महापालिकाही सतर्क झालीय. मुंबई महापालिकेनं कस्तुरबा रुग्णालयात दहा बेड्सचा एक विलगीकरण कक्ष उभारला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram