Maharashtra Mumbai Corona : महाराष्ट्र, मुंबईत कोरोनाचा उद्रेक, मुंबईत 20,181 राज्यात 36,266 रुग्ण
Continues below advertisement
मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज एकाच दिवसात 36,265 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 8,907 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आजपर्यंत एकूण 65 लाख 33 हजार 154 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 96.17 टक्के इतकं झालं आहे. राज्यातील मृत्यूदर हा 2.08 इतका झाला आहे. राज्यात सध्या 5 लाख 85 हजार 758 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये असून 1368 व्यक्ती या संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
Continues below advertisement