Dilip Lande : आमदार लांडेंनी नाल्यात बसवलेला कंत्राटदार रुग्णालयात, कचरा अंगावर फेकल्याने इन्फेक्शन

Continues below advertisement

मुंबई मध्ये गेल्या तीन दिवसात झालेल्या पावसाने ठिकठिकाणी मोठ्या प्रमानात पाणी भरले आहे. यामुळे मुंबईची नालेसफाईबाबत विरोधक जोरदार टीका करीत आहेत.अश्यातच चांदीवली च्या शिवसेनेच्या आमदार दिलीप लांडे यांना चक्क पालिकेच्या कंत्राटदाराला नाल्याच्या कचऱ्यात बसविण्याची आज वेळ आली.चांदीवली मधील संजय नगर भागात मोठया प्रमाणत नाले तुंबलेले होते. या बाबत नागरिकानी तक्रार केल्यावर स्थानिक आमदार दिलीप लांडे हे त्या ठीकानी गेले, सोबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देखील घेऊन गेले आणि ही नालेसफाई सुरू केली.मात्र या नालेसफाई चे कंत्राट ज्या कंत्राटदाराला दिले होते , त्याला त्या ठिकाणी बोलावून आमदारांनी त्याला चक्क त्याच नाल्याच्या कचऱ्यात बसवले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram