Mumbai: मुंबई पालिकेकडून ऑक्सिजन प्लांटची उभारणी ABP Majha
दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिका सतर्क झालीय.. नव्या विषाणूचा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी मुंबईला ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी मुंबईत नवा जंबो ऑक्सिजन प्लांट लवकरच कार्यान्वित करण्यात येणारेय.. खासदार राहुल शेवाळे यांनी पूर्व उपनगरातील माहुल परिसरातील या ऑक्सिजन प्लांटला भेट देत इथल्या कामाचा आढावा घेतला.. भारत पेट्रोलियम आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लवकरच सुरू होणाऱ्या या प्लांटमधून दिवसाला सुमारे दीड हजार ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा केला जाणार आहे..