Worli Covid Center : वरळीत नव्या कोविड सेंटरची उभारणी, 70 टक्के ऑक्सिजन बेड्स उपलब्ध #Corona
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. राज्यात कोरोनाची स्थिती अधिक गंभीर होताना दिसत आहे. कारण रविवारी राज्यात कोरोना रुग्णांच्या उच्चांकांची नोंद झाली आहे. रविवारी 63 हजार 294 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात शनिवारी 55 हजार 411 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी, 34 हजार 008 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 349 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.7 टक्के एवढा आहे.