#Remdesivir पुण्यात रेमडेसिवीरसाठी 25 हजारांची मागणी, काळाबाजार सुरूच असल्याचा ग्राहकांचा दावा

 पुणे : राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात दररोज साठ हजारांच्या जवळ कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने राज्यात बेड्स, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा देखील मोठ्या प्रमाणार तुटवडा निर्माण झाला आहे. पुण्यात पंधरा हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज असताना जेमतेम सहा हजार इंजेक्शन्स मिळाल्याच प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. मात्र मागणीच्या तुलनेत त्यांची संख्या बरीच कमी असल्यानं आज आणि उद्या देखील पुण्यात रेमडीसीव्हरची कमतरता जाणवणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola