Congress Protest : शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, उद्या राज्यात आंदोलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई: दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या राज्यात काँग्रेसतर्फे आंदोलन केलं जाणार आहे. काँग्रेस पक्ष दिल्लीत होत असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात उद्या आंदोलन करणार आहे. शेतकऱ्यांना समर्थन तसंच केंद्र सरकारने केलेला कृषी कायदा विरोधक यासाठी आंदोलन केले जाणार आहेत. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस जिल्हा अध्यक्षांना यासंदर्भात आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक ब्लॉक मुख्यालय येथे हे आंदोलन होणार आहे. कोविडच्या नियमांचे पालन करुन आंदोलन करावे, असं सांगण्यात आलं आहे.