Mumbai : PM Modi यांच्या 'त्या' वक्तव्यावरून मुंबईत काँग्रेस - भाजपमध्ये राडा

पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातल्या कोरोना स्थितीवरून केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात आज पुन्हा एकदा राडा पाहायला मिळाला. मोदींच्या वक्तव्यावरून काँग्रेसनं मुंलुंडमधील खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता मात्र नेहमीप्रमाणे काँग्रेसच्या आंदोलनाआधीच भाजप कार्यकर्त्यांनी इथे गोळा होत जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. एवढंच नव्हेत तर आज काँग्रेसचा मोर्चा आला नाही तर त्यांच्या कार्यालयावर भाजप मोर्चा काढेल अशी चिथावणीही दिली. काही वेळानंतर काँग्रेसचा मोर्चा आला, यावेळी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर काहीही गोंधळाची स्थती निर्माण झाली होती मात्र पोलिसांनी त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola