Colaba - Seepz Metro चं काम वेगावं सुरू, मेट्रो रेलचे आणखी 3 डबे मुंबईत दाखल

Continues below advertisement

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेवरील तिसऱ्या मेट्रो गाडीचे चार डबे शनिवारी आरे कारशेडमध्ये दाखल झाले. आता लवकरच आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथून आणखी चार डबे दाखल होणार आहेत. त्यानंतर या डब्यांची जोडणी करून गाडीची चाचणी केली जाईल. मेट्रो ३ मार्गिकेतील पहिल्या टप्प्यासाठी नऊ गाड्यांची आवश्यकता असून त्यातील दोन गाड्या आणि तिसऱ्या गाडीचे चार डबे आले आहेत. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर मेट्रो-३ या प्रकल्पाच्या कामाला प्रचंड वेग आला आहे. पहिला टप्पा तसंच आरे कारशेडचं उद्घाटन डिसेंबर २०२३मध्ये करण्याचं टार्गेट मेट्रो प्राधिकरणाला देण्यात आलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram