कोस्टल रोडला कोळी बांधवांचा विरोध नाही, तर पिलरसंदर्भात विरोध, 3-4 दिवसात मार्ग काढू : Aslam Shaikh
मच्छिमारांच्या विविध प्रश्नांसाठी मागील काही दिवसांपासून वरळी कोळीवाड्यात आंदोलन सुरु आहे. आंदोलनाची कोणीही दखल घेत नसल्याचा दावा करत मच्छिमारांनी मागील 3-4 दिवसांआधी कोस्टल रोडचे काम बंद पाडले. मच्छिमारांकडून मागणीकरण्यात येत आहे की कोस्टल रोडच्या खांबांमधील अंतर हे 60 मीटर ठेवण्यात आले आहे ते वाढवून 200 मीटर करावे. आजयाचसंदर्भात मत्स्य आणि बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांनी वरळी कोळीवाड्याला भेट देत आंदोलनकर्त्यांशी आणि कोळी बांधवांशीचर्चा केली. त्याचसोबत समुद्रात ज्या ठिकाणी कोस्टल रोडचे काम सुरु आहे तिथे जात पाहाणी केली.