CNG PNG Price Hike : सीएनजी आणि पीएनजी पुन्हा महागलं ABP Majha
Continues below advertisement
सीएनजी आणि पीएनजी पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडनं ग्राहकांना पुन्हा एकदा दरवाढीचा झटका दिला आहे. महानगर गॅसकडून मुंबईत सीएनजीच्या दरात प्रति किलो साडेतीन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. घरगुती पीएनजीच्या दरात प्रति एससीएम दीड रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मुंबईत ही दरवाढ ५ नोव्हेंबरपासून लागू होईल. मुंबईत सीएनजीचे वाढलेले दर ८९.५० रुपये प्रति किलो तर घरगुती पीएनजीचा दर हा ५४ रुपये प्रति एससीएम आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजी व पीएनजी दरात आतापर्यंत अनेकदा वाढ केली आहे. त्यामुळं आता महागाईची झळ सर्वसामान्य मुंबईकरांना सोसावी लागणार आहे.
Continues below advertisement