Uddhav Thackeray Ayodhya Visit | सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्य़ावर जाणार आहेत. महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस झाल्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येत रामजन्मभूमीचं दर्शन घेणार आहेत. दरम्यान, शिवसेनेनं हिंदुत्वाची कास सोडली नसल्याचं अधोरेखित करण्यासाठी हा अयोध्या दौरा होत असल्याची चर्चा आहे.