Maratha Reservation प्रश्नी मुख्यमंत्री गांभीर्याने काम करत आहेत : संजय राऊत

मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation)  आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (PM Modi)  भेट घेणार आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तोक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. आज सकाळी ही भेट होणार आहे. मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री गांभीर्याने काम करत आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola