CM Thackeray Speech : Incubation Center, युती आणि उबवलेली अंडी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण

Continues below advertisement

Cm Uddhav Thackeray in Baramati : आम्हीही इतके दिवस पवारांचे टीकाकार होतो. शिवसेनाप्रमुख मला सांगायचे की बारामतीत शरदबाबू जे करतायत ते बघायला हवे. राजकारणात देखील इनक्युबेशन सेंटर आम्ही पंचवीस- तीस वर्षांपूर्वी उघडले होते. इनक्युबेशन सेंटर म्हणजे उबवणी केंद्र. पण दुर्दैवाने काय उबवले हे आपण पाहतो आहोत. आम्हीही नको ती अंडी उबवली, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. ते बारामतीमधील कृषी महाविद्यालयातील इनक्युबेशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. बारामती देशातील सर्वोत्तम केंद्र झाल्याशिवाय राहणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram