CM Eknath Shinde Speech : लोकसभा निवडणुकीत कांद्यामुळे थोडा त्रास झाला, थोडं रडवलंही

Continues below advertisement

राज्यात पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे 
निवडणुकीच्या काळात तापमान अधिक होतं 
आजच्या  बैठकीचा विषय गंभीर होता त्यामुळे मी स्वतः हजर राहिलो आहे 
एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकऱ्यांचे विषय हाताळण्यासाठी नेहमी पुढे असतो 
मी गावी जातो आणि शेती सुद्धा करतो काही लोक म्हणतात की मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतात पण वेळेचं बचत व्हावं यासाठी मी हेलिकॉप्टरने जातो 
बांबूच्या शेतीसाठी सरकारने अनुदान देण्याचे ठरवलेलं आहे 
तापमान कमी करायचं असेल तर मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली पाहिजे 
2022 ला बांबू लावला होता तेव्हा लावावा लागतो 
यावेळी बांबू लावले नसते तर आज ही बैठकीला या ठिकाणी हजर नसतो 
सर्व प्रकल्प ठप्प झालेले होते 
एक विचारधाराची सरकार येणं गरजेचं होतं 
मग नंतर भाजपा शिवसेना विचारधारेची नवीन सरकार आलं 
या निवडणुकीत कांद्यामुळे आम्हाला थोडा त्रास झाला थोडा मला रडवलं 
मराठवाडा विदर्भात सोयाबीन आणि कापूस त्यामुळे थोडा त्रास झाला 
या सर्वांसाठी मी प्रावधान केलं होतं परंतु आचारसंहिता लागल्याने त्याचं वाटप करता आलं नाही 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत याबाबत चर्चा केलेली आहे 
काही भागात विरोधात निगेटिव्ह सेट केल्यामुळे आम्हाला नुकसान झालं 
संविधान बदलणार हे सांगण्यात आलं 400चा नारा सुद्धा देण्यात आला हे लोकांनी डोक्यात ठेवलं आणि गडबड झाली 
शेतकऱ्यांना दुःखी ठेवून कोणी सुखी होणार नाही 
त्यामुळे आमचे सरकार शेतकऱ्यांसाठी सर्व काही करत आहे 
लवकर केंद्रीय कृषिमंत्री यांची वेळ घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडू.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram