Mumbai : शिंदे गटातील नवनियुक्त मंत्र्यांचं Balasaheb Thackeray यांच्या Memorial ला अभिवादन
Balasaheb Thackeray Memorial : शिंदे गटातील नवनियुक्त मंत्री आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन केल. मंत्रिपद मिळाल्यानंतर शिंदे गटातील सर्व नऊ मंत्री एकत्रितपणे बाळासाहेब ठाकरे यांच्या दादरच्या शिवाजी पार्क इथल्या स्मृतिस्थळी (Memorial) येऊन दर्शन घेतलं. यावेळी शिवाजी पार्क परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. इथे बॅरिकेडिंग देखील करण्यात आली आहे. या नवनियुक्त मंत्र्यांचं अभिनंदन करणारे आणि स्वागताचे पोस्टर्स शिवाजी पार्क परिसरात लावण्यात आले आहेत.