CM Eknath Shinde Full PC aurangabad : कर नाही तर डर कशाला, शिंदेंचा भाजपच्या सूरात सूर : ABP Majha
Continues below advertisement
शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री अचानकपणे केलेला दिल्ली दौरा आणि आज सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर झालेली ईडीची कारवाई यातील संबंधाबाबत आता नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यात पुरामुळे नुकसान झालेल्या भागाच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला गेले होते. त्यानंतर दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली असल्याची माहिती होती. या दौऱ्यानंतर आज सकाळी राऊतांच्या घरी ईडीने कारवाई करणे, या योगायोगाबाबत चर्चा सुरू झाल्यात.
Continues below advertisement