Vasai Fort Row: 'तुम्हाला मराठी येत नाही का?', शिवाजी महाराजांच्या वेशातील तरुणाचा सुरक्षारक्षकाला सवाल

Continues below advertisement
वसई किल्ल्यावर (Vasai Fort) छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) वेश परिधान केलेल्या तरुणाला फोटो काढण्यापासून रोखल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, यात सुरक्षारक्षकाने हिंदीत संवाद साधल्याने तरुण संतापल्याचे दिसत आहे. 'अशा आढळनी परप्रांतीयाला आमच्या गड किल्ल्यावरती आणि महापुरुषांच्या वास्तूंच्या ठिकाणी अजिबात नेमणूक करू नये', अशी संतप्त प्रतिक्रिया मराठी एकीकरण समितीचे (Marathi Ekikaran Samiti) अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 'किल्ले वसई मोहीम परिवार' आणि 'अनामप्रेम महाराष्ट्र' यांच्या दीपोत्सव कार्यक्रमावेळी ही घटना घडली. 'महाराजांच्या गड किल्ल्यांवर अशी मनाई आम्ही खपवून घेणार नाही,' असे म्हणत या तरुणाने सुरक्षारक्षकाला जाब विचारला. या प्रकारामुळे गड-किल्ल्यांवरील सुरक्षेचा आणि स्थानिक भाषेच्या वापराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola