Helipad Mishap : President Murmu उतरताच हेलिकॉप्टरचं चाक जमिनीत रुतलं, Kerala मधल्या घटनेनं सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Continues below advertisement
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या केरळ दौऱ्यात हेलिकॉप्टरसोबत एक मोठी घटना घडली आहे. पठाणमथिट्टा (Pathanamthitta) जवळ हेलिकॉप्टर उतरल्यानंतर त्याचे चाक नव्याने बनवलेल्या हेलिपॅडमध्ये रुतले. 'राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हेलिकॉप्टरमधून उतरुन गेल्यानंतर ही घटना घडलेली आहे'. ही घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उतरवण्याचे ठिकाण ऐनवेळी बदलण्यात आले होते आणि हेलिपॅड तातडीने तयार करण्यात आले होते. काँक्रीट पूर्णपणे सेट न झाल्याने हेलिकॉप्टरच्या वजनाने चाक जमिनीत रुतले. यानंतर, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जोर लावून हेलिकॉप्टर बाहेर काढले. सुदैवाने, राष्ट्रपती आधीच उतरल्यामुळे कोणताही अनर्थ घडला नाही.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement