Raj Thackeray : सी-लिंक प्रकल्पग्रस्तांचं राज ठाकरेंकडे गाऱ्हाणं; पूर्वसूचना न दिल्याचा आरोप
कीकडे वरळी-शिवडी - न्हावाशेवा सागरी सेतू प्रकल्पाचा विस्तार होत असताना तिकडे यातील प्रकल्पग्रस्त राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. या सी-लिंकमुळे वरळी, प्रभादेवी, एल्फिन्स्टन, परळ, शिवडी भागातील रहिवाश्यांची घरं आणि दुकानं बाधित होत असल्याची या प्रकल्पग्रस्तांची तक्रार आहे. तसंच या प्रकल्पाबाबत स्थानिक प्रशासनानं कोणतीही नोटीस किंवा पूर्वकल्पना दिली नसल्याचा या प्रकल्पग्रस्तांचा आरोप आहे. गेली १०० वर्ष या भागात राहत असल्यानं विस्थान झाल्यास जवळच घरं मिळावी अशी या प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. या प्रकल्पग्रस्तांनी गाऱ्हाणं मांडल्यानंतर आता राज ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याचं आश्वास या प्रकल्पग्रस्तांना दिलंय.