Beed : बीड ZP च्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला प्रीतम मुंडे गैरहजर; धनंजय मुंडेंचा टोला
आज बीड जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला या लोकार्पण सोहळ्यासाठी बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांचे नाव टाकण्यात आले होते आणि व्यासपीठावर लावलेल्या बॅनर्स वर सुद्धा टाकलेले होते पण त्या या कार्यक्रमाला गैरहजर होत्या. हाच धागा धरून धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना आवाहन केले आहे की कधी तरी बीड जिल्ह्यात विकास कामासाठी एका व्यसपीठावर बसून जिल्ह्याची घडी बसवणे गरजेचे आहे.