Goregaon Aare मधील तलावात विसर्जनाला बंदी , Eco Sensitive Zone चं कारण : ABP Majha

Continues below advertisement

इको सेन्सिटिव्ह झोनच्या नावाखाली मुंबईतल्या आरे तलावात गणपती विसर्जन करण्यासाठी आरे प्रशासनाकडून यावर्षी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळं मुंबईच्या गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीतील घरगुती आणि सार्वजनिक मिळून सहा हजार गणपतींच्या विसर्जनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आरे तलावात गणपती विसर्जन बंदीच्या निर्णयाविरोधात शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन पुकारण्यात आलं होतं. गोरेगाव पूर्व येथील आरे चेक नाका परिसरात हे आंदोलन करण्यात आलं. आरे प्रशासन आणि मुंबई महापालिकेनं आरे तलावात गणपती विसर्जनासाठी विरोध केला तर त्यांना आरेतील जनतेच्या प्रक्षोभाला सामोरं जावं लागेल असा इशारा वायकरांनी दिला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram