CIDCO Lottery : हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी; उद्या चार हजार घरांची लॉटरी
मुंबईच्या आसपास आपलं हक्काचं घर घेण्याच्या विचारात असलेल्या मध्यमवर्गियांसाठी खूशखबर आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सिडकोनं नवी मुंबईतल्या घरांसाठी मेगालॉटरी काढणार असल्याची घोषणा केली आहे. सिडकोची सदनिका, व्यावसायिक गाळे आणि भूखंडांसाठी ही मेगा लॉटरी असणार आहे. सिडकोच्या वतीनं गणेश चतुर्थीच्या दिवशी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्राहकांना गुरुवारपासून अर्ज करता येणार आहे. ही लॉटरी चार हजार 158 घरं, 245 दुकाने आणि सहा व्यावसायिक भूखंडांसाठी असेल. नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोड येथे ही घरं आहेत.