Children Vaccination: मुलांच्या लसीकरणासाठी पालक उदासिन, लसीकरण रखडलं ABP Majha
Continues below advertisement
आधी मुलांच्या लसीकरणासाठी आग्रह धरणारे पालक आता मुलांच्या लसीकरणाची वेळ आल्यानंतर उदासिन असल्याचं चित्र आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांतील हजारो विद्यार्थ्यांचं लसीकरण पालकांच्या संमतीविना रखडल्याची माहिती समोर आलीय. मुंबई महापालिकेच्या शाळांतील ३७ हजार विद्यार्थी लसीकरणासाठी पात्र आहेत. पण २४ हजार विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला पालकांनी परवानगी दिलीय आणि आतापर्यंत २१ हजार विद्यार्थ्यांचं लसीकरण झालंय. तिसऱ्या लाटेत मुंबईतल्या शाळा सुरू करण्याची तयारी सुरु झालीय. पण पालकांच्या उदासिनतेमुळे हजारो विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचं काय असा सवाल उपस्थित झालाय.
Continues below advertisement
Tags :
Vaccination Depression School Parents Mumbai Municipal Corporation For Vaccination Of Children