Param Bir Singh आणि 5 पोलीस अधिकाऱ्यांविरोधातील वसुली प्रकरणात Chhota Shakeel ची एन्ट्री ABPMajha

Continues below advertisement

#Chhota Shakeel #Parambirsingh #ABPMajha

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि ५ पोलीस अधिकाऱ्यांवर सुरु असलेल्या वसुली प्रकरणात आता दाऊदचा हस्तक छोटा शकीलची एंन्ट्री झालीय. या प्रकरणात तक्रार दाखल करणाऱ्या श्यामसुंदर अग्रवालच्या म्हणण्यानुसार त्याला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं आणि त्याला मोक्का लावण्यात आला. त्याला आणि कुटुंबीयांना धमकावून वसुली करण्यात आली असा आरोप श्यामसुंदर अग्रवालनं केलाय. या प्रकरणात एबीपीच्या हाती काही फोन रेकॉर्डिंग लागलं आहे, ज्यात एक व्यक्ती बिल्डर संजय पुनमिया याला फोन करून धमकी देत असल्याचं ऐकू येतंय. श्यामसुंदर अग्रवालबरोबरचा मुद्दा त्यानं मिटवला नाही तर त्याला जीवानिशी मारण्याची धमकी दिलीय. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा फोन अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय छोटा शकीलनं केला होता, त्यामुळे या प्रकरणात मोक्का लावला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram