केमिस्ट, फार्मासिस्ट यांना लोकलसाठी QR Code मिळत नाही, अत्यावश्यक सेवेत असूनही लोकल प्रवासात अडचण
अत्यावश्यक सेवेत असून सुद्धा केमिस्ट, फार्मसिस्ट यांना अत्यावश्यक सेवेत लोकल प्रवाससाठी अद्याप परावनगी नाही. मेडिकल दुकानमालक लोकल प्रवाससाठी क्यू आर कोड मिळत नसल्याने अडचणीत आले आहेत. मागील 15 महिन्यांपासून कोरोना काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या केमिस्ट, फार्मसिस्ट, केमिस्ट सेल्समन यांना प्रशासनाकडून लोकल प्रवासासाठी क्यूआर कोड मिळत नसल्याने अडचणीत वाढ झाली आहे.