Chembur मध्ये भर रस्त्यात Rupali चंदनशिवेची हत्या, इक्बाल शेखला पोलिसांनी ठोकल्या बेड्या : ABP Majha
धार्मिक रीतीरिवाज पाळत नाही आणि मुलाचा ताबा देत नाही या रागातून आंतरधर्मीय लग्न केलेल्या पतीने पत्नीची गळा चिरून भर रस्त्यात हत्या केलीये.. चेंबूरमध्ये ही धक्कादायक घटना घडलीये.. पहिल्या पत्नीकडून मूल होत नाही म्हणून इक्बाल शेख नावाच्या या आरोपीने रुपाली चंदनशिवे हिच्याशी तीन वर्षांपूर्वी लग्न केलं होतं.. त्यांना एक दोन वर्षाचा मुलगाही आहे. मात्र लग्नानंतर रुपालीला मुस्लिम रीतिरिवाज जमत नव्हते. यावरून तिचं आणि इक्बालची रोज भांडण व्हायचं. त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून ते विभक्त झाले होते. मात्र काल संध्याकाळी त्याने भेटण्यासाठी रुपालीला नागेवाडी भागात बोलावलं... आणि भर रस्त्यात तिच्यावर चाकूने वार करून पळ काढला. यात रुपालीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी इक्बालला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.